Sunday, May 7, 2023

युगाचार्य स्वामी विवेकानंद

 


युगाचार्य स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीतील अध्यात्मक्षेत्रातील स्वयंप्रकाशी ताऱ्यासारखे होते. त्यांचा जन्म बंगालमधील कलकता शहरात १२ जानेवारी १८६३ रोजी दत्त घराण्यात झाला. त्यांचे पिताजी विश्वनाथजी माता भुवनेश्वरीदेवी. स्वामीजीचे जन्मनाव नरेंद्र दत्त कुटुंब हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्याचा परिणाम नरेंद्रच्या बालमनावर झाला. लहानपणापासूनच नरेंद्रची वृत्ती चिकित्सक होती. साधु- संन्यासी दिसताच त्यांना प्रश्न विचारायचे. कोणी काही कोणी काही उत्तरं गायचे त्यांचे त्यामुळे समाधान होत नव्हते. त्यामुळे नास्तिकतेकडे नरेंद्रनाथ वळत होते. एकदा त्यांची भेट श्रीरामकृष्ण परमहंसाशी झाली. त्यांनी प्रश्न केला महाराज, आपला ईश्वरावर विश्वास आहे काय ? 'श्रीरामकृष्ण तात्काळ म्हणाले 'होय' 'महाराज आपण त्याच्या अस्तित्वासंबंधी काही प्रमाण देऊ शकाल काय ? 'होय'. ते प्रमाण कोणते ? प्रमाण हेच की मी तुला जसा आपल्यासमोर बघतो आहे. त्यालाही अगदी तसाच बघत आहे. या उत्तराने नरेंद्रनाथ फार प्रभावित झाले. त्यांनी श्रीरामकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. नरेंद्रनाथ पुढे कॉलेजमध्ये शिकायला गेले परंतु त्यांचे तिकडे लक्ष लागेना. ते दक्षिणेश्वरला श्रीरामकृष्णाकडे सतत जावू लागले. अध्यात्मसाधना करू लागले. नरेंद्रनाथाचे ते स्वामी विवेकानंद झाले. केवळ अध्यात्मसाधक राहता ते परिव्राजक झाले. पुढे स्वामीजी १८९३ च्या सप्टेंबर महिन्यात शिकागो येथील धर्मपरिषदेत गेले. त्या परिषदेत माझ्या भगिनींनो आणि बंधुनो वा प्रेमभावनेच्या शब्दांनी सारा जनसमुदाय हेलावून सोडला. अमेरिकेत त्यांची विविध विषयावर समर्पक व्याख्याने झाली. युरोप खंडातही त्यांची भाषणे झालीत. भारतात परत आल्यावर आपल्या गुरुदेवाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी श्रीरामकृष्ण मिशनची स्थापना केली. अशा या युगाचार्यानि वयाच्या ३९ व्या वर्षीच जुलै १९०२ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. त्यांनी नश्वर देह सोडला तरी त्यांचे अमर वाङ्मय लाखो लोकांना मार्गदर्शन करीत आहे. सत्कार्याची प्रेरणा देत आहे.

मुल्या :-  त्याग, वैराग्य, वक्तृत्व, गुरुनिष्ठा

लेखक
प्रा. रघुनाथ कडवे

No comments:

Post a Comment

राष्ट्रसंत तुकडोजीची ग्रामविकास दृष्टी

ग्राम तसा देश १. गावचि भंगता अवदशा ग्राम हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्ष। गावचि भंगता अवदशा । येईल देशा ।। (ग्राम १.४९) ग्राम ही ...